॥ मि त्र स म्प्रा प्तिः ॥ ( क थामु ख ) विष्णुशर्मानी राजकुमारांना बुद्धिमान बनवण्यासाठी 1 मित्रभेद, 2 मित्रप्राप्ति, 3 काकोलूकीयम्, 4 लब्धप्रणाश आणि 5 अपरिक्षितकारक नावाची नीतीशास्त्राची पाच प्रकरणं/ तंत्र लिहीली. त्यातील मित्रप्राप्ति हे दुसरं तंत्र येथे सुरू होत आहे. या परा ब्रह्मणः शक्तिः परावागनपायिनी । चिदानन्दस्वरूपा या सा शिवा पातु सर्वतः । । ( परावागनपायिनी – परा + वाक् + अनपायिनी. परा वाक् – वैखरी, मध्यमा, पश्यन्ती ह्या तीन वाणींच्या पलीकडची जी मूलाधार चक्राचे ठायी नांदणारी परा वाणी. अनपायिनी – अत्यंत स्थिर, निश्चल, स्थायी, शाश्वत. ) विष्णुशर्मा त्याच्या जवळ विद्या शिकण्यासाठी राहणार्या राजपुत्रांना म्हणाला, ‘‘अशाप्रकारे मित्रसम्प्राप्ति (मैत्री संपादन करणे) हे दुसरं तंत्र सुरू होत आहे. त्यातील पहिला श्लोक पुढीलप्रमाणे आहे. एखादं क्लिष्ट, अवघड, महत्त्वपूर्ण काम करताना, चांगल्यापैकी शिक्षण घेतलेले हुशार, तरबेज, विविध प्रकारचा अनुभव असलेले तज्ज्ञ लोक साधनांची कमी आहे म्हणून अडून बसत नाहीत. कसही करून सर्व कमतरतांवर मात करत ते आपलं काम पूर्...
Comments
Post a Comment