22 नृपसेवक-वानर-कथा

 

 22 नृपसेवक-वानर-कथा


एक वानर कोण्या एका राजाचा अंगरक्षक म्हणून काम करत असे. तो वानर राजाचा मोठा भक्त होता. त्या राजाचा त्या वानरावर अत्यंत विश्वास असल्या करणाने तो वानर राजाच्या अंतःपुरातही सहज प्रवेश करत असे. महालात कोठेही येत जात असे. त्याला कोणी अडवत नसे. एक दिवस राजा झोपल्यावर तो वानर राजाला पंख्याने वारा घालत होता. त्याच वेळेला एक माशी राजाच्या छातीवर येउन बसली. त्या वानराने पंख्याने तिला उडवायचा प्रयत्न केला. पण ती माशीही एकदा उडाली तरी चिकटपणे वारंवार येऊन तिथेच बसत होती. त्या वानराला राजाला त्रास देणार्‍या त्या माशीचा अत्यंत राग आला होता. वानराचा स्वभाव मुळातच चंचल, उतावळा असल्याने त्या मूर्ख वानराने त्या माशीला मारण्याच्या उद्देशाने तेथे असलेली राजाची अत्यंत धारदार तलवार उचलली आणि माशीवर जोरदार प्रहार केला. ती माशी तर उडून गेली पण, त्या जोरदार वारामळे राजाचे मात्र त्याक्षणीच दोन तुकडे झाले आणि राजा मरण पावला.

म्हणून दीर्घ आयुष्याची कामना करणार्‍या राजाने अशा मूर्ख सेवकांपासूनच स्वतःचा बचाव करायला हवा. स्वतःचे रक्षण करायला हवे कारण ह्या मूर्खांच्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही. त्यांचा उतावळेपणा, मूर्खपणा राजाच्या जीवावर बेतू शकतो.

---------------------------------------

 


Comments

Popular posts from this blog

तंत्र 2 मित्रसम्प्राप्तिः (अनुक्रमणिका)

॥ पंचतंत्र कथामुखम् ॥ (आरंभ)

॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)