Posts

॥ पंचतंत्र कथामुखम् ॥ (आरंभ)

  ॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥   पंच तंत्र कथा मुखम् ॥  ( आरंभ) (वृत्त -स्रग्धरा; अक्षरे – 21; गण – म र भ न य य य ; यति- 7, 7, 7. ) ब्रह्मा रुद्रः कुमारो हरिवरुणयमा वह्निरिन्द्रः कुबेर – श्चन्द्रादित्यौ   सरस्वत्युदधियुगनगा वायुरुर्वी भुजङ्गाः। सिद्धा नद्योऽश्विनौ श्रीर्दितिरदितिसुता मातरश्चण्डिकाद्या वेदास्तीर्थानि यज्ञा गणवसुमुनयः पान्तु नित्यं ग्रहाश्च॥ 1 ॥ (वृत्त -स्रग्धरा; अक्षरे – 21; गण – म र भ न य य य ; यति- 7, 7, 7. ) रक्षावे नित्य सर्वां विधि, हर, हरिने, स्कंद, अग्नी, यमाने इंद्राने, सूर्य, चंद्रे, वरुण, उदधिने , यक्षराजा कुबेरे रक्षावे शारदेने, पवन, अवनिने, सिद्ध वर्गे, भुजंगे सार्‍या ह्या पर्वतांनी, सकलचि सरिता, दैत्यमाता दितीने ।। 1.1 ।। लक्ष्मी, देवादिवृंदे, सकल युग सवे चारही वेद यांने सारी ही पुण्य-तीर्थे, सकल शिवगणे अश्विनी देववैद्ये रक्षावे चंडिकेने जगत मुनिगणे सर्व यज्ञेच तैसे आकाशीच्या ग्रहांनी, सकल वसुगणे लोक तीन्ही जपावे ।। 1.2 ।। ( वृत्त – आर्या. ) मनवे वाचस्पतये शुक्राय पराशराय ससुताय। च...

3 शबर-शूकर कथा

  3 शबर - शूकर कथा एका जंगल प्रदेशात एक पारधी रहात होता. एकदा शिकार करण्यासाठी तो जंगलात गेला. तेथे त्याला जणु काय काजळाचाच पर्वत असावा असे भल्या मोठ्या   आकाराचे रानडुक्कर हिंडताना दिसले.   त्यानेही लगेचच आपल्या धनुष्याला बाण जोडून त्याची दोरी/ प्रत्यंचा कानापर्यंत ताणून एक तीक्ष्ण बाण त्या रानडुकरावर सोडला. वर्मावर बाण लागल्या रानडुकरानेही चवताळून त्या पारध्यावर हल्ला चढवला आणि त्याच्या अर्धचंद्राकार दातांनी त्या व्याधाचा कोथळाच बाहेर काढला. पोटच फाटल्याने तो पारधी जमिनीवर कोसळला आणि मरण पावला. आणि इकडे वर्मावर बसलेल्या बाणामुळे ते रानडुक्करही तडफडत शेवटी मरून पडलं. ह्या घटनांमधेच भुकेने व्याकूळ झालेला बरेच दिवस काही खायला न मिळाल्याने मरायला टेकलेला एक कोल्हा इकडे तिकडे खाण्याच्या शोधात तेथे आला. तेथे ते रानडु्क्कर आणि पारधी दोघेही मरून पडलेले पाहून मनात अत्यंत आनंदित   होऊन त्याने विचार केला, ‘‘अरे वा वा! आज माझं दैव फार जोरात दिसतय. मी कधी विचारही केला नसेल असं भोजन आज माझ्यासमोर हजर आहे. सर्वच अतर्क्य आहे. कोणीतरी जे म्हटलं आहे ते अगदी खरच आहे. तुम्...