॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ (कथामुख)
॥ मित्रसम्प्राप्तिः ॥ ( क था मु ख ) या परा ब्रह्मणः शक्तिः परावागनपायिनी । चिदानन्दस्वरूपा या सा शिवा पातु सर्वतः । । विष्णुशर्मा त्याच्या जवळ विद्या शिकण्यासाठी राहणार्या राजपुत्रांना म्हणाला, ‘‘अशाप्रकारे मित्रसम्प्राप्ति (मैत्री संपादन करणे) हे दुसरं तंत्र सुरू होत आहे. त्यातील पहिलाच श्लोक पुढीलप्रमाणे आहे. एखादं क्लिष्ट, अवघड, महत्त्वपूर्ण काम करताना, चांगल्यापैकी शिक्षण घेतलेले हुशार, तरबेज, विविध प्रकारचा अनुभव असलेले तज्ज्ञ लोक साधनांची कमी आहे म्हणून अडून बसत नाहीत. कसही करून सर्व कमतरतांवर मात करत ते आपलं काम पूर्णत्वाला नेतातच! पूर्वी एक कावळा, उंदीर, हरिण आणि कासव ह्यांनी असाध्य वाटणारं काम साध्य करून दाखवलं होतं. कसं ते आपण पाहू. (1) असाधना अपि प्राज्ञा बुद्धिमन्तो बहुश्रुताः। साधयन्त्याशु कार्याणि काकाखुमृगकूर्मवत् ।। 1 ।। जरी साधन-सामग्री । योग्य ना लाभली तरी । अशक्यप्राय कामेही । जाणते करती पुरी ।। 1.1 काक मूषक, कूर्माने । हरिणाने मिळून त्या जसे दुष्कर कर्मासी । करुनी दाविले जगा ।। 1.2 कसं ते ऐका! भारतात दक्षिणेकडे म...